अतिरिक्त निधीची ट्रम्प यांची मागणी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

वॉशिंग्टन : उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या धोक्‍याचा सामना करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी सुमारे चार अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत देण्याची मागणी सोमवारी अमेरिकी कॉंग्रेसकडे केली आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प हे पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जात असून, त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली असल्याचे मानले जाते.

या प्रकरणी ट्रम्प यांनी कॉंग्रेसला एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, की उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याला तोंड देण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक बळकट करण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी अतिरिक्त चार अब्ज डॉलरचा निधी मंजूर करण्यात यावा. 

दक्षिण आशियामध्ये अतिरिक्त साडेतीन हजार सैनिक तैनात करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.