हल्लेखोराने हवाई दलाच्या त्रुटीचा गैरफायदा घेतला 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

ह्यूस्टन : टेक्‍सास चर्चमध्ये गोळीबार करून 26 जणांना ठार करणाऱ्या हल्लेखोराने अमेरिका हवाई दलाच्या चुकीचा फायदा उचलल्याचे आज अधिकाऱ्याने म्हटले आहे.

लष्करी नियमानुसार एफबीआयला हल्लेखोराची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी अमेरिकी हवाई दलाने वेळेत सादर न केल्याने तो शस्त्र विकत घेऊ शकला, असे अधिकाऱ्याने नमूद केले. 

26 वर्षांचा डेव्हिन पॅट्रिक केली याने रविवारी सकाळी सथरलॅंड स्प्रिंग्ज येथील चर्चवर बेछुट गोळीबार केला होता. काळ्या रंगाचे बुलेटप्रूफ जॅकेट आणि मास्क घातलेल्या केलीने रुदर एआर-556 सेमी ऑटोमेटिक रायफलचा वापर केला होता.

चर्चमध्ये केलेल्या हत्याकांडात 18 महिन्यांच्या बाळापासून 77 वर्षांचे ज्येष्ठ बळी पडले होते. डेव्हिन केली हा अमेरिकी हवाई दलात कार्यरत होता. यादरम्यान 2012 मध्ये पहिली पत्नी आणि सावत्र मुलास मारहाण केल्याप्रकरणी कोर्ट मार्शलअंतर्गत दोषी ठरवले होते. त्याने एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे; परंतु कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी दोषी असलेल्या केलीची माहिती अमेरिकेच्या डेटाबेसमध्ये नमूद करण्यात दिरंगाई झाली आणि याचाच फायदा घेत केली.

हा 2016 मध्ये कोणत्याही चौकशीविना शस्त्र खरेदी करण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर आणखी एक बंदूक खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यामागे कौटुंबिक वादही असू शकतो, असे म्हटले जाते.

Web Title: marathi news marathi websites US Shooting