लाइफ ऑफ स्टीफन हॉकिंग

stephen-hawking
stephen-hawking

केंब्रिज - महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले.

रॉजर पेनरोज यांच्यासोबत केलेले ब्लॅक होलसंदर्भातील संशोधनापासून क्वांटम मेकॅनिक्समधील थिअरी मांडण्यापर्यंत डॉ. हॉकिंग यांनी जागतिक विज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन केले.

स्टीफन हॉकिंग यांच्या विषयी

  • 8 जानेवारी 1942 - इंगलंडमध्ये ऑक्सफोर्ड येथे जन्म झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. चार भावंडांपैकी स्टीफन सगळ्यात मोठे होते. 
  • 1952 - सेंट अल्बान्स शाळेमध्ये शिक्षण
  • 1959 - ऑक्सफोर्ड विद्यापिठात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तेथे नैसर्गिक विज्ञानात पटवी घेतली.
  • 1962 - केंब्रिज विद्यापीठात कोस्मोलॉजीमध्ये संशोधन केले.
  • 1963 - वयाच्या 21 व्या वर्षी मोटर न्यूरॉनची व्याधीजडल्याचे निदान झाले. त्यावेळी डॉक्टरांनी हॉकिंग फार तर दोन वर्षे जगू शकतील, असा अंदाज वर्तविला होता. 
  • 14 जुलै 1965 - केंब्रिज येथे भेटलेल्या जेन वाइल्ड या आधुनिक भाषेतील विद्यार्थ्यीनीशी विवाह केला.
  • 1970 - जेन आणि स्टीफन यांनी कन्यारत्न प्राप्त झाले.
  • 1974 - वयाच्या 32व्या वर्षी रॉयल सोसायटीच्या सदस्यांमध्ये निवड.
  • 1979 - केंब्रिज विद्यापीठात गणित विषयाचे लुकासियन प्राध्यापक झाले, एकेकाळी आयझॅक न्यूटनने हे प्रतिष्ठित पद भूषविले होते. 2009 पर्यंत स्टीफन यांनी प्रध्यापक म्हणून काम केले.
  • 1985 - जिनिव्हा येथील रुग्णालयात दाखल झाले. मोटर न्यूरॉन डिसीजमुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण जाते. सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. यासाठी त्यांना कृत्रीम आवाज देण्यात आला. संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.
  • 1988 - अ ब्रीफ थेरी ऑफ टाईम पुस्तक प्रकाशीत झाले. जे अल्पावधीतच लोकप्रीय झाले.
  • 1995 - त्यांची नर्स इलेन मेसन हिच्याशी विवाह केला.
  • 2007 - या दोघांचाही घटस्फोट झाला.
  • 2014 - हॉकिंगचे जीवनावर बेतलेला ऑस्करविनिंग बायोपिक 'द थिअरी ऑफ चीट्स' चित्रपट आला. जेन हॉकिंग यांच्या ट्रव्हलिंग टू इन्फिनिटी- माय लाइफ विथ स्टीफनवर बेतलेला तो होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com