'तो' माथेफिरू बंदुकीसह अमेरिकन हवाई दलातही घुसला होता!

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

सासूशी खूप वेळ वाद घातल्यानंतर डेव्हिन पॅट्रिक केली याने रविवारी सदरलँड स्प्रिंग्ज गावातील फर्स्ट बॅप्टिस्ट चर्चमध्ये जाऊन अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये 26 लोक मृत्युमुखी पडले होते.

 

वॉशिंग्टन : टेक्सासमधील एका चर्चमधील 26 लोकांचा बळी घेणारा माथेफिरू डेव्हिन हा यापूर्वी अमेरिकन हवाई दलाच्या तळावरही बंदुका घेऊन घुसला होता. त्यावेळी 2012 मध्ये तो एका मानसिक आरोग्य केंद्रातून पळाला होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

सासूशी खूप वेळ वाद घातल्यानंतर डेव्हिन पॅट्रिक केली याने रविवारी सदरलँड स्प्रिंग्ज गावातील फर्स्ट बॅप्टिस्ट चर्चमध्ये जाऊन अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये 26 लोक मृत्युमुखी पडले होते. त्याची सासू याच चर्चमध्ये जाते. या गोळीबाराच्या घटनेनंतर डेव्हिन तेथून काही अंतरावर स्वतःच्या गाडीत मृतावस्थेत आढळला होता. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. 

दरम्यान, यापूर्वी डेव्हिन केली याला हवाई दलाने कोर्ट मार्शलची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला वाईट वर्तनाबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. पुढे न्यू मेक्सिकोमधील 'पीक बिहेविअरल हेल्थ सिस्टम्स' येथून त्याने पळ काढला. काही महिन्यांनंतर आपली घटस्फोटित पत्नी आणि तिच्या अपत्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्याच्यावर होता. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :