आम्हाला तुमच्या निवडणुकीत ओढू नका: पाकिस्तान

Pakistan
Pakistan

इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीत पाकिस्तानकडून काँग्रेसला मदत होत असल्याचा आरोप केल्यानंतर पाकिस्तानने स्पष्टीकरण देताना आम्हाला तुमच्या निवडणुकीत ओढू नका, तुम्ही तुमच्या बळावर निवडणुका जिंका, असे म्हटले आहे.

मोदी यांनी प्रचारसभेत बोलताना म्हटले होते, की कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी याअनुषंगाने झालेल्या बैठकीस पाकिस्तानच्या लष्कराचे महासंचालक, पाकचे उच्चायुक्त आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवसापासून पाकिस्तानने गुजरातच्या निवडणुकीमध्ये रस घ्यायला सुरवात केली. अय्यर यांनी तर मला नीच माणूस ठरविले असून, हा केवळ गुजरातचाच नाही तर संपूर्ण देशाचा अवमान आहे. मोदींच्या या वक्तव्यावरून वादळ उठले असतानाच आता पाकिस्तानने स्पष्टीकरण देताना आम्हाला निवडणुकीत ओढू नका असे म्हटले आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी ट्विट करत म्हटले आहे, की भारताने आपल्या निवडणुकीतील प्रचारात पाकिस्तानला आणण्यापासून आणि तथ्यहिन आरोप करण्यापासून रोखले पाहिजे. स्वबळावर त्यांनी आपला विजय निश्चित केला पाहिजे. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा वापर करणे चुकीचे असून, आमच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com