मोदी व घनी यांच्यात संवेदनशील चर्चा

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून हिंसाचार व अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेल्या अशांत अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती भारताच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असून या देशात सातत्याने बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानमधील राजकीय प्रभाव अधिकाधिक वाढविण्याच्या प्रयत्नांत भारतीय नेतृत्व आहे

अमृतसर - पंजाबमधील अमृतसर येथे सुरु होणाऱ्या "हार्ट ऑफ एशिया' परिषदेमधील विविध देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीस प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी चर्चा केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी एका ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. मोदी व घनी हे संयुक्तरित्या मंत्र्यांच्या या चर्चासत्राचे उद्‌घाटन करणार आहेत.

भारत, चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसमवेत 14 देशांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी झाले असून, अन्य 17 सहयोगी देशांच्या प्रतिनिधींचाही यामध्ये समावेश आहे. तालिबान्यांच्या संकटाचा सामना करणारा अफगाणिस्तानदेखील या परिषदेत कळीचा मुद्दा ठरणार असून भारत-अफगाणिस्तानदरम्यान अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य करार होणे अपेक्षित आहे.

अफगाणिस्तानविषयक सध्याच्या जागतिक राजकारणामधून उद्‌भविणारे अनेक प्रश्‍न अफगाणिस्तानच्या भविष्याच्या दृष्टिकोनामधून महत्त्वाचे आहेतच; मात्र भारतीय उपखंडासहित आशिया खंडाच्या कानाकोपऱ्यात या प्रश्‍नांच्या उत्तरांची दाहक स्पंदने जाणविणार आहेत. गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून हिंसाचार व अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेल्या अशांत अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती भारताच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असून या देशात सातत्याने बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानमधील राजकीय प्रभाव अधिकाधिक वाढविण्याच्या प्रयत्नांत भारतीय नेतृत्व आहे.

ग्लोबल

सोल : कोरिया द्विपकल्पात कोणत्याही प्रकारचे युद्ध होणार नाही, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांनी म्हटले आहे. उत्तर...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

हैदराबाद - हैदराबाद येथील एका महिलेचा सौदी अरेबियामध्ये मानसिक व लैंगिक छळ केला...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

वॉशिंग्टन- काश्मीरमधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017