जी-20 परिषदेत मोदी, शी यांच्यात हस्तांदोलन, चर्चा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

सिक्कीम सेक्‍टरमध्ये भारत व चीन या दोन देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही चर्चा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगळे यांनी एका ट्विटद्वारे मोदी-शी चर्चा झाल्याचे सांगितले

हॅंबुर्ग - जर्मनीत सुरु असलेल्या जी - 20 परिषदेसाठी उपस्थित राहिलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज (शुक्रवार) एकमेकांना हस्तांदोलन करत विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. "ब्रिक्‍स' देश प्रमुखांच्या अनौपचारिक बैठकीदरम्यान ही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. 

सिक्कीम सेक्‍टरमध्ये भारत व चीन या दोन देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही चर्चा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगळे यांनी एका ट्विटद्वारे मोदी-शी चर्चा झाल्याचे सांगितले. 

मोदी व शी यांच्यामध्ये चर्चा होण्यासाठी वातावरण चांगले नसल्याची आक्रमक भूमिका चीनकडून घेण्यात आली होती. मात्र यानंतरही ही भेट झाली आहे.

भारताने "आडमुठेपणा' कायम ठेवत चीनचे "न ऐकल्यास' सिक्कीममधील वाद मिटविण्यासाठी चीनला सैन्यबळाचा वापर करावा लागेल, असा इशारा येथील तज्ज्ञांनी दिला आहे.