मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

सोमवारी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे. ते खरे मित्र असून, त्यांच्यासोबत महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर चर्चा होईल.

वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालहून अमेरिकेत दाखल झाले असून, आज (रविवार) ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदी माझे खरे मित्र असल्याचे ट्विट केले आहे.

मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेत पोहचले. पोर्तुगालहून ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. वॉशिंग्टनमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले असून मोदींसाठी विमानतळाबाहेर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनीदेखील गर्दी केली होती. तर मोदींचे आगमन होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी खरा मित्र असल्याचे सांगत द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करु असे म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार मोदी हे अमेरिकेला भेट देत असून ट्रम्प तसेच अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मोदी चर्चा करणार आहेत. ट्रम्प यांनी ट्विटरवर लिहिले आहे, की सोमवारी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे. ते खरे मित्र असून, त्यांच्यासोबत महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर चर्चा होईल.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार
पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​
आंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​
संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​
प्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​
सारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​