इसिसविरोधात लढण्यासाठी भारताकडून फीलिपीन्सला आर्थिक मदत

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

फीलिपीन्सची राजधानी असलेल्या मनिला शहराच्या दक्षिणेस सुमारे 800 किमी अंतरावर असलेल्या मिंडानो प्रांतामध्ये इसिसशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेशी फिलिपिनो सैन्य लढत आहे. या लढाईमध्ये आत्तापर्यंत फिलिपिनो सैन्यामधील किमान 90 सैनिक व 380 दहशतवादी ठार झाले आहेत

नवी दिल्ली - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेविरोधात लढण्यासाठी भारताकडून फीलिपीन्स या देशास 3.2 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. भारताकडून प्रथमच अन्य देशास अशा स्वरुपाचा मदतनिधी देण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व फीलिपीन्सचे परराष्ट्र मंत्री ऍलन पीटर सायेतानो यांच्यामधील चर्चेनंतर भारताकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

फीलिपीन्सची राजधानी असलेल्या मनिला शहराच्या दक्षिणेस सुमारे 800 किमी अंतरावर असलेल्या मिंडानो प्रांतामध्ये इसिसशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेशी फिलिपिनो सैन्य लढत आहे. या लढाईमध्ये आत्तापर्यंत फिलिपिनो सैन्यामधील किमान 90 सैनिक व 380 दहशतवादी ठार झाले आहेत. याशिवाय बऱ्याच नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.

ही लढाई अद्यापी सुरु असून दहशतवाद्यांच्या तावडीत शेकडो नागरिक असल्याचे आढळून आले आहे.