'नेपाळने लोकशाहीच्या उभारणीत सर्वांना सहभागी करून घ्यावे'

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

काठमांडू - लोकशाहीच्या उभारणीमध्ये नेपाळमधील सर्व समाजघटकांना सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज व्यक्त केली. जवळचा शेजारी या नात्याने नेपाळमध्ये शांतता, स्थैर्य आणि विकास व्हावा अशीच भारताची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपती मुखर्जी सध्या नेपाळच्या भेटीवर आहेत. त्यांनी आज नेपाळमधील कांतीपूर आणि काठमांडू पोस्ट या वृत्तपत्रांना मुलाखत दिली आहे. त्यात ते म्हणतात, 'शाश्‍वत सामाजिक व आर्थिक विकास हा केवळ शांतता व सर्वसमावेशक लोकशाहीतून साध्य होतो. लोकशाहीत प्रत्येक समाजघटकाला समान स्थान असले पाहिजे. हे आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो आहोत. नेपाळला देखील त्यांची लोकशाही व्यवस्था सुदृढ करण्यासाठी आमचा अनुभव उपयोगी पडेल.''

दरम्यान, राष्ट्रपतींनी आज नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराला भेट दिली आणि तेथे रुद्राभिषेक पूजा केली.