काही सेकंदात बदला डोळ्यांचा रंग

eye-color-change
eye-color-change

कॅलिफोर्निया - निळेशार सुंदर डोळे सगळ्यांच आवडतात. अशा निळ्या डोळ्यांची देणगी फार कमी लोकांना मिळते. परंतु, आता तुम्हाला तुमच्या डोळ्यांचा रंग कायमस्वरूपी बदलायचा असल्यास लवकरच तसे करता येणे शक्य होणार आहे. कॅलिफोर्नियातील एका संस्थेने डोळ्यांचा रंग कायमस्वरूपी बदलण्यासाठी लेझर उपचार पद्धती शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे डोळे निळ्या रंगाचे करता येणे शक्य होणार आहे. 

कॅलिफोर्नियातील स्ट्रॉमा हेल्थ संस्थेच्या डॉ. ग्रेग हॉमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे डोळ्यांचा रंग बदलण्यासाठी फक्त 20 सेकंदाची लेझर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान डोळ्यातील काही रंगद्रव्ये काढून टाकल्यास डोळ्यांचा रंग कायमस्वरूपी निळा करता येणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

अशा प्रकारच्या लेसर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढील चाचण्या सुरु असून, त्यात यश मिळाल्यास काही दिवसातच डोळ्यांचे रंग बदलण्यासाठी वापरात येणाऱ्या रंगीबेरंगी काँटॅक्ट लेन्सचे युग इतिहासजमा होणार असल्याचे डॉ. हॉमर यांचे मत आहे.

व्हिडिओ सौजन्य - WPTV News youtube

ही शस्त्रक्रिया करताना स्कॅनिंगद्वारे बुबुळाचे चित्र घेतल्यानंतर ज्या भागावर उपचार करावयाचा, त्यावर लेझर किरणांचा मारा केला जातो. बुबळाच्या भागावर एकाच वेळी लेझर किरणांचा मारा केला जातो. या उपचारासाठी केवळ 20 सेकंदाचा कालावधी लागतो. लेझर किरणे बुबुळाच्या पृष्ठभागावर असलेला मेलॅनीनचा थर काढून टाकतात त्यामुळे डोळ्यांचा रंग निळा होतो. अशी माहिती डॉ. हॉमर यांनी दिली. 

असे असले तरी या शस्त्रक्रियेबद्दल वैद्यकीय क्षेत्रात अनेक मतभेद निर्माण झाले आहेत. दृष्टिपटलावर जास्तीची लेझर किरणे गेल्यामुळे दृष्टिदोष निर्माण होण्याचा धोका असल्याचे काही नेत्रतज्ज्ञांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com