'यूएन'च्या आमसभेसाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये

वृत्तसंस्था
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

आठ दिवसांच्या दौऱ्यात विविध देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या आज न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्या. भारताच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून स्वराज जगभरातील विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी या दौऱ्यात चर्चा करणार आहेत.

स्वराज यांचा हा दौरा आठवडाभराचा असून, त्यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील एक शिष्टमंडळही न्यूयॉर्कमध्ये पोचले आहे. "यूएन'च्या आमसभेला हजेरी लावण्यासाठी येथे आलेल्या विविध देशांच्या नेत्यांबरोबर स्वराज द्विपक्षीय व त्रिपक्षीय स्तरावरील 20 बैठका घेणार आहेत. स्वराज यांचे येथील विमानतळावर स्वागत करण्यासाठी भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना आणि भारताचे "यूएन'मधील कायमस्वरूपी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन हे उपस्थित होते.

दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी (सोमवारी) स्वराज या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन आणि जपानचे परराष्ट्रमंत्री टारो कोनो यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठकीत सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका आणि जपान यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती.

तसेच "यूएन'च्या सरचिटणीसांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या सुधारणांच्या प्रक्रियेला 120 पेक्षा अधिक देशांनी पाठिंबा दिला असून, त्यात भारताचाही समावेश आहे.