न्यूझीलंडचे आता "किवीज फर्स्ट'

पीटीआय
गुरुवार, 20 एप्रिल 2017

येत्या सप्टेंबरमध्ये येथे निवडणुका होत असून, या बदलांद्वारे येथे संतुलन ठेवण्याचा प्रयत्न आहे. किमान वेतनाबाबतही निर्णय घेतला जाणार असून, विशिष्ट काळासाठी व्हिसा घेऊन आलेल्या लोकांच्या जादा मुक्कामावरही निर्बंध घालणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले

वेलिंगटन - अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या शेजारील देशांनी स्थलांतरितांवर निर्बंध घातल्यानंतर न्यूझीलंडनेही आता "किवीज फर्स्ट' हे धोरण स्वीकारले आहे. कुशल कामगारांच्या व्हिसासाठीची धोरणे अधिक कडक करत न्यूझीलंडने हा निर्णय जाहीर केला आहे.

न्यूझीलंडचे स्थलांतरविषयक मंत्री मायकल वूडहाउस यांनी सांगितले, की आगामी निवडणुकीत हाच मुद्दा असेल, असे म्हटले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये येथे निवडणुका होत असून, या बदलांद्वारे येथे संतुलन ठेवण्याचा प्रयत्न आहे. किमान वेतनाबाबतही निर्णय घेतला जाणार असून, विशिष्ट काळासाठी व्हिसा घेऊन आलेल्या लोकांच्या जादा मुक्कामावरही निर्बंध घालणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तंत्रज्ञान आणि बांधकाम या क्षेत्रांना याचा फटका बसणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.