किम जोंग यांचा अण्वस्त्र परीक्षण न करण्याचा निर्णय ही आनंदाची बातमी - ट्रम्प

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढला होता. परंतु, आता किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आज (शनिवार) पासूनच हे परीक्षण थांबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हुकुमशहा किंग जोंग उन हा निर्णय म्हणजे जगासाठी आनंदाची बातमी असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

किम जोंग उन यांनी ही घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून नॉर्थ कोरिया आणि जगासाठी ही आनंदाची बातमी असल्याचे म्हटले आहे. तसेच किम जोंग उन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतल्या चर्चेसाठी आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

उत्तर कोरियाचे हुकुमशहा अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणस्त्रांचे परीक्षण थांबवण्या बोरबरच त्याचे केंद्रीही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. नॉर्थ कोरियाने जाहीर केलेला हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर हा महत्त्वपूर्ण निरमअय असून, देशाची आर्थिक परिस्थिती बघता किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तूळात होत आहे.

Web Title: North Korea 'halts missile and nuclear tests', says Kim Jong-un