तेलउत्पादन कपातीचा "ओपेक'कडून आढावा

यूएनआय
शनिवार, 20 मे 2017

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भावे प्रतिबॅरल सुमारे 53 डॉलर आहेत. तेलाच्या उत्पादनातील कपातीमुळे हे भाव काही प्रमाणात स्थिर होण्यास मदत झाली आहे. मात्र, बाजारपेठेतील पुरवठा वाढत असल्याने भाव अस्थिर होण्याची शक्‍यता आहे

व्हिएन्ना - तेलउत्पादक देशांची संघटना "ओपेक'ची पुढील आठवड्यात धोरणात्मक बैठक होत असून, या पार्श्‍वभूमीवर संघटनेची समिती कच्च्या तेलाच्या उत्पादन कपातीचा आढावा घेत आहे.

"ओपेक'मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेच्या तेरा सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि "ओपेक'च्या व्हिएन्ना कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीची बुधवारी आणि गुरुवारी बैठक झाली. ही बैठक आजही सुरू आहे. समितीने बाजारपेठेतील अंतिम स्थितीबाबत असमाधान व्यक्त केले आहे. बाजारपेठेतील स्थिती सुधारण्यासाठी कच्च्या तेलाच्या उत्पादनात आणखी कपात करण्याची गरज असून, ही कपात "ओपेक'चे सदस्य नसलेल्या देशांकडून वाढणारे उत्पादन लक्षात घेऊन करावी, असे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

"ओपेक' आणि इतर देशांच्या पेट्रोलियम मंत्र्यांची धोरणात्मक बैठक 25 मे रोजी होत आहे. या बैठकीत 30 जूननंतर तेलाच्या उत्पादनातील कपात कायम ठेवण्याबाबत निर्णय होणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भावे प्रतिबॅरल सुमारे 53 डॉलर आहेत. तेलाच्या उत्पादनातील कपातीमुळे हे भाव काही प्रमाणात स्थिर होण्यास मदत झाली आहे. मात्र, बाजारपेठेतील पुरवठा वाढत असल्याने भाव अस्थिर होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: OPEC panel looking at deepening, extending oil cuts

टॅग्स