लादेनचा मुलगा आंतरराष्ट्रीय दहशतवादी

यूएनआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

2015 मध्ये हमजाला अल कायदाचा सदस्य म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. या वेळी त्याने एक ध्वनिफित प्रसिद्ध करत पाश्‍चिमात्य देशांच्या राजधान्यांवर दहशतवादी हल्ला करण्याचे आवाहन केले होते

वॉशिंग्टन - कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन (वय 27) याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. ओसामाला ठार मारल्यानंतर हमजाने अल कायदाचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला आहे.

2015 मध्ये हमजाला अल कायदाचा सदस्य म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. या वेळी त्याने एक ध्वनिफित प्रसिद्ध करत पाश्‍चिमात्य देशांच्या राजधान्यांवर दहशतवादी हल्ला करण्याचे आवाहन केले होते. 2016 मध्येही त्याने एक ध्वनिफित प्रसिद्ध करत अमेरिकेवर हल्ला करत सूड उगवणार असल्याचे सांगितले होते.

Web Title: Osama's son declared a international terrorist