"युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'साठी पाककडून 30 कोटी

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

पेशावर - "युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका मदरसास पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वां प्रांतामधील सरकारने तब्बल 30 कोटी पाकिस्तानी रुपयांचा अर्थनिधी मंजूर केला आहे. या मदरसामध्ये तालिबानचा म्होरक्‍या मुल्ला ओमर याच्यासहित इतर अनेक अफगाण तालिबानी दहशतवाद्यांनी शिक्षण घेतले आहे. ओमर याला या मदरसाकडून मानद डॉक्‍टरेटही देण्यात आली आहे. 

""दारुल उलूम हक्कानिया नौशेरा मदरसास 30 कोटी रुपयांचा अर्थनिधी मंजूर करताना मला अभिमान वाटतो,‘‘ असे या प्रांतामधील मंत्री शाह फरमान यांनी सांगितले. या प्रांतामधील इतर मशिदी व मदरसांनाही सरकारकडून निधी पुरविण्यात येत आहे. तेहरिक-इ-इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाचे सरकार या प्रांतामध्ये आहे. धार्मिक संस्थांवर छापे न मारता त्यांना आर्थिक मदत देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे फरमान यांनी स्पष्ट केले. 

1947 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मदरसाचे मुख्य सध्या मौलाना सामी उल-हक आहेत. हे मौलाना पाकिस्तानमधील 40 पेक्षा जास्त संघटनांची एकत्रित संस्था असलेल्या दिफा-इ-पाकिस्तानचेही अध्यक्ष आहेत. दिफा-इ-पाकिस्तानमध्ये जमात उद दवा आणि सिपाह-इ-सहाबा यांसारख्या दहशतवादी संघटनांचाही समावेश आहे. 

Web Title: pak funds university of jihad