विमानाने उड्डाण घेतल्यावर वैमानिकाने घेतली अडीच तास झोप!

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

इस्लामाबाद - इस्लामाबादमधून 305 प्रवाशांना घेऊन लंडनच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) विमानातील मुख्य वैमानिकाने विमान प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या हाती सोपवून तब्बल अडीच तास झोप घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच वैमानिक आमीर अख्तर हाशमीने संपूर्ण विमान प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या हाती सोपवले. त्यानंतर त्याने बिझनेस क्‍लासच्या कॅबिनमध्ये तब्बल अडीच तास झोप घेतली. हाशमी झोपलेला असताना एका प्रवाशाने काढलेले छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. छायाचित्र काढणाऱ्या प्रवाशाने हाशमीविरुद्ध तक्रार केली आहे. 'हाशमीकडील विमान उडविण्याची जबाबदारी काढून घेतली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे', अशी माहिती पीआयएच्या प्रवक्‍त्याने दिली.

हाशमी वैमानिकांचा प्रशिक्षक आहे. त्याला मासिक एक लाख रुपये वेतन देण्यात येते. लंडनला निघालेल्या विमानात त्याच्यासोबत अली नावाच्या प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. त्याला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी हाशीमची होती. मात्र, प्रशिक्षण देण्याऐवजी थेट संपूर्ण विमानाची जबाबदारी सोपवून हाशमी चक्क झोपी गेला.

Web Title: Pak Pilot Slept For 2 Hours In Business Class. Flight Had 305 Passengers