पाकमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या दोन भारतीयांना अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

इस्लामाबाद/ कराची : गेल्या आठ वर्षांपासून कराचीत बेकायदापणे राहणाऱ्या दोन भारतीयांना अटक करण्यात आल्याची माहिती सिंध जनगणना आयुक्त अब्दुल अलीम मेमन यांनी दिली. अटक करण्यात आलेले दोघेही गुजरातचे आहेत. सोमवारी घेतलेल्या देशव्यापी जनगणनेच्या दरम्यान त्यांना कराची येथील गुलशन इ इक्‍बाल आणि सद्दर परिसरातून अटक करण्यात आली.

जनगणना अधिकाऱ्यांनी या दोन्ही भारतीयांबद्दलची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पोलिस आणि गुप्तचर संस्थांनी तेथे छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांपासून हे भारतीय येथे बेकायदेशीरपणे राहात होते. हसन अहमद (रा. अहमदाबाद) आणि वासीम हसन अशी अटक केलेल्यांची नावे असून ते दोघेही येथील दुनिया या स्थानिक दूरचित्रवाणीचे वार्ताहर म्हणून काम करीत होते. हे दोघेही कायदेशीर कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात राहात होते.

Web Title: Pakistan arrested two Indians who illegally