दहशतवाद्यांवर कारवाईची पाकची अमेरिकेला ग्वाही

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन/इस्लामाबाद, ता. 10 (पीटीआय) : भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी आज पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.

मॅटिस यांच्याशी बोलताना जनरल बाज्वा यांनी दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानच्या लढाईवरून पुन्हा जुनीच कटिबद्धता जाहीर केली.
जनरल बाज्वा यांच्याशी चर्चा करताना मॅटिस यांनी अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय लष्करी संबंधांच्या आवश्‍यकतेवर जोर दिला. बाज्वा यांनी मॅटिस यांना विश्‍वास देताना सांगितले, की पाकिस्तान आपल्या सीमाभागात कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांविरुद्धची आपली लढाई कायम ठेवेल.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री मॅटिस यांनी पहिल्यांदा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाज्वा यांच्याशी चर्चा केली. मॅटिस स्वत:ही अमेरिकी लष्कराचे निवृत्त जनरल आहेत. पेंटागॉनने या चर्चेसंबंधीची माहिती दिली.