पाक दूतावासामधील दोघे हेरगिरी करताना आढळले

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

काबूल- पाकिस्तानी दुतावामधील दोन कर्मचारी अफगणिस्तानमध्ये हेरगिरी करताना आढळून आले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (गुरुवार) दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान दूतावासामधील दोघे जण काबूलमध्ये हेरगिरी करताना आढळले होते. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या अधिकाऱयांनी त्यांना ताब्यात घेतले असून, कोठडीत ठेवण्यात आले आहे. हसन खान्झदा व सईद मनिर शहा अशी दोघांची नावे आहेत. पाक दूतावासामध्ये खान्झदा हे व्हिसा सहाय्यक तर शहा हे चालक म्हणून काम करत आहेत. दोघांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या अधिकाऱयांनी अफगणिस्तानशी संपर्क साधून दोघांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.