पाकिस्तानच्या कैदेत 546 भारतीय

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

इस्लामाबाद: सुमारे 546 भारतीय नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने याबाबतची यादी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांच्याकडे सुपूर्त केली असून, यातील बहुतांशी कैदी हे मच्छीमार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उभय देशांत 2008 मध्ये झालेल्या एका कराराअंतर्गत ही माहिती देण्यात आली. त्यानुसार, सध्या पाकिस्तानी तुरुंगात भारताचे 52 नागरिक आणि 494 मच्छीमार कैद आहेत. संबंधित करारानुसार, भारतानेही त्यांच्याकडे कैदेत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांबाबतची माहिती पाकिस्तानी उच्चायुक्तांना उपलब्ध करून द्यावी, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

संबंधित करारानुसार, उभय देशांना त्यांच्याकडे कैदेत असलेल्या नागरिकांची माहिती वर्षातून दोनवेळा (1 जानेवारी व 1 जुलै) देणे बंधनकारक आहे. दरम्यान, चालू वर्षात 1 जानेवारीला दिलेल्या माहितीनुसार, 351 भारतीय पाकिस्तानच्या कैदेत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापैकी 219 जणांची 6 जानेवारीला सुटका करण्यात आली होती. तर, 77 जणांची 10 जुलै रोजी सुटका करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.