शरीफ यांची याचिका न्यायालयाने स्वीकारली

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

इस्लामाबाद: "पनामा पेपर्स'प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज दाखल करून घेतली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुले, जावई आणि अर्थमंत्री इशाक दार यांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी पाच सदस्यांच्या खंडपीठाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. शरीफ यांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयामुळे अनेक कायद्यांचा भंग झाला असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी पाच सदस्यांच्या खंडपीठाची नियुक्ती करण्यासही न्यायालयाने मंजुरी दिली आहे.