म्हणे भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

इस्लामाबाद, : पाकिस्तानकडूनच प्रत्यक्ष ताबा रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असताना आज पाकिस्तानने भारतावरच गोळीबाराचा आरोप केला आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारताकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून आज पाकिस्तानने भारताचे उप उच्चायुक्त जेपी सिंह यांना पाचारण केले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, दक्षिण आशिया आणि सार्कचे महासंचालक डॉ. मोहंमद फैजल यांनी सिंह यांना पाचारण केले आणि भारतीय जवानांकडून अकारण शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची तक्रार केली. त्यात म्हटले की, 29 ऑगस्टला केलेल्या कथित गोळीबारात कोटेरा सेक्‍टरमध्ये एका 55 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर संयम बाळगूनसुद्धा भारताकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचीही आवई पाकिस्तानने या तक्रारनाम्यात उठवली आहे. सामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. ही कृती मानवाधिकार आणि मानवाधिकार कायद्याच्या विरोधात असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. 2003 च्या शस्त्रसंधी कराराचा मान राखावा असे महासंचालकाने म्हटले असून, अन्य घटनेची चौकशी करावी असे म्हटले आहे. पाकिस्तानने भारताकडून चालू वर्षात 700 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला असून, त्यात 29 नागरिक मारले गेल्याचा दावा केला आहे.