कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा : "डॉन'

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

लाहोर : कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्तानने व्हिसा मंजूर करायला हवा, असे मत पाकिस्तानातील आघाडीचे "डॉन' वृत्तपत्राने म्हटले आहे. मानवीय दृष्टिकोनातून आणि उभय देशातील तणाव कमी यासाठी पाकिस्तानने जाधव यांच्या आईला भेटीची परवानगी द्यावी, असे मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने जाधव यांची भेट नाकारली जात आहे. आपल्या मुलाला पाहण्यासाठी भेटीची परवानगी द्यावी, असा अर्ज पाकिस्तानकडे कुलभूषण यांच्या आईने केला असून तो मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

"डॉन'ने संपादकीयमध्ये म्हटले की, पाकिस्तानला चालून आलेली संधी असून ती गमावू नये. दरम्यान, पाकिस्तानने म्हटले की, जाधव यांच्या आईच्या अर्जावर विचार केला जात आहे. भारतीय नौदलात काम करणारे कमांडर जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे.