"लष्करे तैयबा', "जैश'वर अंकुश न ठेवल्यास मानहानी

वृत्तसंस्था
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना उपरती

इस्लामाबाद: "लष्करे तैयबा' आणि "जैश-ए-महंमद'सारख्या दहशतवादी संघटनांवर अंकुश न ठेवल्यास पाकिस्तानला जागतिक पातळीवर सतत मानहानीला सामोरे जावे लागेल, असा इशारा देशाचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे.

पाकिस्तानातून चालविल्या जाणाऱ्या या दहशतवादी संघटनांबाबत दोनच दिवसांपूर्वी "ब्रिक्‍स' परिषदेत ठराव करण्यात आला होता. पाकिस्तानासाठी हा दणका मानला जातो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तान हा दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे नुकतेच म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आसिफ यांच्या ताज्या वक्तव्याला महत्त्व आहे.

पुढील आठवड्यात ते चीनला भेट देणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर "जिओ न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले,""आम्ही आमचे घर दुरुस्त केले आहे, हे जगातील आपल्या मित्रदेशांना सांगण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर मानहानी टाळण्यासाठी आपल्याला आपले घर आधी दुरुस्त करावे लागेल. त्यासाठी या संघटनांवर निर्बंध लादावे लागतील.''

ते म्हणाले,"" "ब्रिक्‍स'चा ठराव म्हणजे चीनची भूमिका असे म्हणता येणार नाही. कारण, या गटात रशिया, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका हे अन्य देशही आहेत. राष्ट्रीय कृती योजनेनुसार आपण काम करीत आहोत काय, हा प्रश्‍न आपण स्वतःला विचारला पाहिजे.''