पहिल्याच दिवशी अब्बासी नवाज शरीफांच्या भेटीला

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

इस्लामाबाद: पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी आज माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊन कामकाजाला सुरवात केली. शरीफ यांना पदावरून हटविण्यात आले असले, तरी नव्या सरकारवर त्यांचेच नियंत्रण राहणार असल्याचे अब्बासी यांच्या आजच्या भेटीवरून स्पष्ट झाले.

पंतप्रधानपदावरून हटविण्यात आल्यानंतर शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मुक्काम सध्या उत्तरेकडील मुरी शहरात आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी अब्बासी यांनी मुरी येथे जाऊन शरीफ यांची भेट घेतली. शरीफ यांचे बंधू आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ हेही या वेळी उपस्थित होते, असे समजते.

शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाकडे पाकिस्तानी संसदेत बहुमत असून, शरीफ यांना हटविण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाने ताबडतोब अब्बासी यांची वर्णी लावली आहे. अब्बासी हे शरीफ यांचे खंदे समर्थक मानले जातात. पाकिस्तानी संसदेत मंगळवारी अब्बासी यांची पंतप्रधानपदी बहुमताने निवड झाली. शाहबाज हे संसदेवर निवडून आल्यानंतर त्यांना पंतप्रधानपदी बसविण्याचा "पीएमएल-एल'चा विचार आहे.