उत्तर कोरियाला पाक पुरविते अाण्विक साहित्य

पीटीआय
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - भारताचा शेजारील देश पाकिस्तान हा उत्तर कोरियाला अण्वस्त्रे पुरवित असल्याची धक्कादायक माहिती अमेरिकेतील केंद्रीय अन्वेषण संस्थेने (सीआयए) भारताच्या "रिसर्च ऍण्ड ऍनालिसीस विंग‘ला (रॉ) दिली आहे. 

पाकिस्तान अण्वस्त्र ऊर्जा आयोग (पीएईसी) मोनेल आणि इकोनेल (अण्विक साहित्य) हे प्योंगयांगला (उत्तर कोरिया) पुरवून संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे "सीआयए‘ने म्हटले आहे. इस्लाबादमधून मोनेल आणि इकोनेल हे चीनमधील बीजिंग सनटेक टेक्‍नॉलॉजी कंपनी लिमिटेडला पोचविण्यात येते. तेथून पाकिस्तानचे अधिकारी समुद्र मार्गाने या वस्तू उत्तर कोरियात पोचवित असल्याची माहिती ‘सीआयए‘ने केला आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध करत असलेले कट कारस्थाने सातत्याने समोर येत आहे. सीआयएच्या माहितीमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्राच्या अणुपुरवठादार गटातील (एनएसजी) सदस्यत्वाची मागणी होत असताना ही माहिती समोर आली आहे.