पाकिस्तान इतर देशांशी युद्धात लढणार नाही : इम्रान खान

Pakistan will not fight any other countrys war says PM Imran Khan
Pakistan will not fight any other countrys war says PM Imran Khan

इस्लामाबाद : ''भविष्यात पाकिस्तान कधीही इतर देशांच्या युद्धात सहभागी होणार नाही'', असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले. इम्रान खान हे सुरवातीपासून युद्धाच्याविरोधात असून, त्यांच्या सरकारचे परराष्ट्रीय धोरण हे देशाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे सांगण्यात येत आहे.  

पाकिस्तानात हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान खान बोलत होते. ते म्हणाले, ''सुरवातीपासूनच मी युद्धाच्याविरोधात आहे. आम्ही भविष्यात इतर देशांच्या युद्धाचा भाग बनणार नाही. आमचे परराष्ट्रीय धोरण हे देशाच्या दृष्टीने सर्वांच्या हिताबाबत असेल. दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या सैन्यासारखे कोणताही देश लढू शकणार नाही. मदीना राज्याच्या सुवर्ण तत्त्वांचे पालन करून शासन सर्व क्षेत्रातील पारदर्शी आणि पारदर्शीपणा आणेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, आता आपल्या सर्वांसमोर देशाला महान बनविण्याचे उद्दिष्ट समजून घेण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com