पाकच्या कारवाईत 39 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद- दक्षिण पाकिस्तानमध्ये लष्कराने केलेल्या कारवाईत इस्लामिक स्टेट ग्रुपचे 39 दहशतवादी ठार झाले आहेत, असा दावा लष्कराने आज (शुक्रवार) केला आहे.

सिंध प्रांतातील सेहवान येथे सुफी लाल शाहबाज कलंदर दर्ग्यात गुरुवारी (ता. 16) रात्री 'इसिस'च्या आत्मघातकी दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात किमान 100 जण ठार, तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत. सिंध प्रांतात गेल्या आठवडाभरात झालेला हा पाचवा हल्ला आहे.

इसिसने केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात लष्कराने कारवाई सुरू केली आहे. लष्कराने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इसिसचे 39 दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार आहे, असे लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे.

Web Title: Pakistani raids kill 39 suspects after attack by Islamic State group.