भारताच्या भीतीमुळेच पाकचे अमेरिकापूरक धोरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पाकवर दबाव आणण्यासाठी सोव्हिएत संघराज्य व भारत हातमिळवणी करतील, अशी पाकिस्तानला चिंता आहे. भारतामध्ये "राष्ट्रीय कमीपणा'ची भावना असल्याचे मतही या अहवालामध्ये व्यक्‍त करण्यात आले आहे

कराची - पाकिस्तानचे अमेरिकेकडे झुकलेले धोरण हे भारताविषयी या देशास वाटत असलेल्या भीतीचा परिणाम असल्याचे निरीक्षण अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएच्या कागदपत्रांमध्ये नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे. सीआयएच्या महत्त्वपूर्ण निरीक्षणांचा अंतर्भाव असलेली ही कागदपत्रे काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पाकिस्तानसंदर्भातील हा अहवाल 1983 मधील आहे.

"पाकिस्तानचे पाश्‍चिमात्य देशांकडे झुकलेले धोरण हे मूलत: पाकला भारत व सोव्हिएत संघराज्याविषयी वाटत असलेल्या भीतीचाच परिपाक आहे. पाकिस्तानला भांडवलवाद वा ख्रिश्‍चन सभ्यतेविषयी विशेष जिव्हाळा नाही. पाकचे धोरण हे सकारात्मक नसून नकारात्मक आहे. पाकिस्तानचे स्वतंत्र अस्तित्व अद्यापीही भारताने मान्य केले नसून, भारतास पाकिस्तानला भारतीय प्रभुत्वाखालील दुबळे "बफर स्टेट' बनवायचे असल्याची पाक नेतृत्वाची धारणा आहे. तसेच पाकवर दबाव आणण्यासाठी सोव्हिएत संघराज्य व भारत हातमिळवणी करतील, अशी पाकिस्तानला चिंता आहे,'' असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

याच अहवालामध्ये पाकिस्तान व चीनमधील जवळिकीबरोबरच, पाकिस्तानला अमेरिकेकडून दिले जाणारे लष्करी सहाय्य व हिंदी महासागरामधील अमेरिकेच्या हस्तक्षेपासंदर्भात भारताला वाटत असलेल्या चिंतेचा उल्लेखही करण्यात आला आहे.

भारतामध्ये "राष्ट्रीय कमीपणा'ची भावना असल्याचे मतही या अहवालामध्ये व्यक्‍त करण्यात आले आहे.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017