'पॅरिस क्‍लायमेट करारा'तून अमेरिकेची माघार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्बन उत्सर्जनासंदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण अशा 'पॅरिस क्‍लायमेट करारा'तून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरातून नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक तापमानवाढी संदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण अशा 'पॅरिस क्‍लायमेट करारा'तून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरातून नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे.

करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित करताना ट्रम्प म्हणाले, 'भारताला कोळश्‍याचे उत्पादन दुप्पट करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चीनलाही शेकडो कोळश्‍याच्या खाणी उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. आम्हाला यातून सुटका करून घ्यायची आहे.'

निवडून आल्यानंतर 100 दिवसांच्या आत या करारातून बाहेर पडण्याचे आश्‍वासन ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच दिले होते. या निर्णयामुळे अमेरिकेतील कोळसा आणि तेल उद्योगाला प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले होते.  या निर्णयामुळे जागतिक तापमानवाढीसंदर्भात अमेरिकेची जबाबदारी आणि कर्तव्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. जागतिक तापमानवाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिने पॅरिस क्‍लायमेट करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.