पॅरिसमध्ये एड्‌स रुग्णांचे प्रमाण घटले

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

पॅरिस: एड्‌समुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आणि बाधित व्यक्तींचे प्रमाण घटले असून 2016 या वर्षांत एड्‌समुळे दहा लाख व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 2005 पेक्षा हा आकडा जवळपास निम्मा आहे.

पॅरिस: एड्‌समुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आणि बाधित व्यक्तींचे प्रमाण घटले असून 2016 या वर्षांत एड्‌समुळे दहा लाख व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 2005 पेक्षा हा आकडा जवळपास निम्मा आहे.

पॅरिसमध्ये रविवारी (ता. 23) सुरू होणाऱ्या एड्‌स सायन्स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, 2005 मध्ये एड्‌समुळे 19 लाख व्यक्तींचा मृत्यू झाला होता. दहा वर्षांनंतर, केवळ एड्‌सबाधित व्यक्तींची संख्या आणि मृत्यूचेच प्रमाण घटलेले नाही, तर बाधित व्यक्तींपैकी आतापर्यंतचे सर्वाधिक जण जीवनरक्षक उपचार घेत आहेत. जगभरात एकूण तीन कोटी 67 लाख व्यक्तींना एड्‌स झाल्याची नोंद असून, त्यापैकी एक कोटी 95 लाख व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रथमच एकूण बाधित व्यक्तींपैकी निम्म्यांहून अधिक व्यक्ती उपचार घेत आहेत. या उपचारांमुळे एड्‌सचे विषाणू मरणार नसले तरी त्यांचा शरीरावर होणारा परिणाम मंदावणार आहे. यामुळे रुग्णांचे आयुष्य वाढण्यास मदत होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. 2016 मध्ये एड्‌सचे 18 लाख नवे रुग्ण आढळले. 1997 मध्ये हीच संख्या 35 लाख होती. एड्‌सवर अद्यापही कोणतीही लस अथवा रामबाण उपचार नाही. एड्‌सचे सर्वाधिक रुग्ण आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहेत.

एड्‌सचा परिणाम

  • 7.61 कोटी : 1980 पासूनचे एड्‌सचे रुग्ण
  • 3.5 कोटी : 1980 पासून एड्‌समुळे मृत्यू
  • 10 लाख : 2016 मध्ये झालेले मृत्यू

टॅग्स

ग्लोबल

स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव या नावाचा आणि आपला थेट काही संबंध नाही. पण, कदाचित या पृथ्वीवर आपण अस्तित्वात आहोत, यामागे स्टॅनिस्लाव्ह...

07.09 PM

नेपिडो : रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रकरणी कोणत्याही आंतरराष्ट्रीय चौकशीला म्यानमार सरकार घाबरत नाही, असे वक्तव्य म्यानमारच्या...

11.30 AM

आठ दिवसांच्या दौऱ्यात विविध देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेला उपस्थित...

सोमवार, 18 सप्टेंबर 2017