एक कोटीचा पिझ्झा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीला पिझ्झ्यामुळे चांगलाच धडा मिळाला आहे. एक दिवस संध्याकाळी त्याने पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा आल्यावर त्याने क्रेडिट कार्डद्वारा त्याचे बिल भरले.

न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीला पिझ्झ्यामुळे चांगलाच धडा मिळाला आहे. एक दिवस संध्याकाळी त्याने पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा आल्यावर त्याने क्रेडिट कार्डद्वारा त्याचे बिल भरले.
दुसऱ्या दिवशी तो सामान खरेदी करायला बाजारात गेला. खरेदी झाल्यावर बिल देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड पुढे केले. त्याच्या कार्डवर काहीच पैसे शिल्लक नसल्याचे लक्षात येताच मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली! त्याच्या अकाउंटमधील जवळपास एक कोटी रुपये (एक लाख ऐंशी हजार डॉलर) काढले गेले होते. त्याने लगेचच बॅंकेशी संपर्क साधला व तक्रार नोंदवली. त्यावेळी त्याच्या लक्षात आले, की आदल्या दिवशी मागविलेल्या पिझ्झ्याचे 18 डॉलर बिल चुकून एक लाख 80 हजार डॉलर दिले गेले आणि त्याचे अकाऊंट रिकामे झाले. अर्थात, तक्रार केल्यानंतर दोन दिवसांत त्याच्या खात्यात पैसे पुन्हा जमा झाले.
 

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017