पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकविरोधात आंदोलन

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

आयएसआय या पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेमार्फत नागरिकांवर घृणास्पद अत्याचार केले जात असल्याची सार्वत्रिक भावना या भागामधून व्यक्‍त करण्यात आली आहे

इस्लामाबाद - जम्मु काश्‍मीर राज्यात भारताकडून अत्याचार केले जात असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून आज (रविवार) "काश्‍मीर एकता दिन' पाळला जात असताना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये मात्र पाकिस्तानविरोधात गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन केले जात आहे.

पाक सैन्याकडून केले जाणारे अत्याचार व मुलभूत मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात पाकव्याप्त काश्‍मीरमधील संतप्त नागरिकांकडून आंदोलन केले जात आहे. आयएसआय या पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेमार्फत नागरिकांवर घृणास्पद अत्याचार केले जात असल्याची सार्वत्रिक भावना या भागामधून व्यक्‍त करण्यात आली आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असलेल्या अत्याचारांचा निषेध नोंदविणाऱ्यांस ठार केले जात आहे; अथवा असह्य अत्याचारांचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. गिल्गिट बाल्टिस्तान भागामध्ये या अत्याचारांची तीव्रता जास्त आहे.

 

ग्लोबल

वॉशिंग्टन : पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी स्वर्ग बनला आहे. अमेरिका आता यावर गप्प बसू शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

10.39 AM

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा...

रविवार, 20 ऑगस्ट 2017