पंतप्रधान मोदी मेमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

कोलंबो: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या मेमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते बुद्धिस्ट कालगणेनुसार महत्त्वाच्या असलेल्या "वेसाक दिवसा'च्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्रीलंकेचे वरिष्ठ मंत्री विजेयदासा राजपाक्षे यांनी आज (बुधवार) दिली.

पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा श्रीलंकेचा दौरा आहे. आपल्या या दौऱ्यात ते 12 ते 14 मे दरम्यान "वेसाक' दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा निश्‍चित असल्याचे राजपाक्षे यांनी सांगितले. यापूर्वी 2015 मध्ये मोदी यांनी श्रीलंकेचा दौरा केला होता.