कुलभूषण यांच्या बदल्यात दहशतवादी सोडण्याचा प्रस्ताव 

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पेशावरमध्ये 2014 मध्ये एका शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या एका दहशतवाद्यास सोडण्याचा प्रस्ताव पाकसमोर आला होता. सध्या तो अफगाणिस्तानात तुरुंगवास भोगत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, आसिफ यांनी या वेळी संबंधित दहशतवाद्याच्या नावाचा आणि प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा उल्लेख करणे टाळले. 

न्यूयॉर्क : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी एका दहशतवाद्याला सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांनी येथे एका चर्चासत्रानंतर माध्यमांशी बोलताना केला.

पेशावरमध्ये 2014 मध्ये एका शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या एका दहशतवाद्यास सोडण्याचा प्रस्ताव पाकसमोर आला होता. सध्या तो अफगाणिस्तानात तुरुंगवास भोगत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, आसिफ यांनी या वेळी संबंधित दहशतवाद्याच्या नावाचा आणि प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा उल्लेख करणे टाळले. 

पेशावरमधील शाळेवर हल्ला करणारा दहशतवादी सध्या अफगाणिस्तानातील तुरुंगात आहे. तुम्ही कुलभूषण जाधव यांना सोडल्यास आम्ही त्याला सोडू अशी ऑफर एका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली होती, असे आसिफ यांनी स्पष्ट केले. लष्करी मार्गाने अफगाणिस्तानची समस्या सोडविता येणे शक्‍य नाही, असे सांगत आसिफ यांनी तेथे राजकीय स्थैर्य निर्माण व्हावे म्हणून आम्ही शक्‍य तेवढी मदत केली, असे नमूद केले.

पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. शेवटी आमच्या प्रयत्नांनाही मर्यादा आहेत. आम्ही अफगाणिस्तानमधील शांतता आणि सुरक्षेची जबाबदारी घेऊ शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.