इम्रान खानची तिसरी पत्नी पळाली...

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

इस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका ही घरामध्ये कुत्र्यांवरून झालेल्या भांडणामुळे घर सोडून गेली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका ही घरामध्ये कुत्र्यांवरून झालेल्या भांडणामुळे घर सोडून गेली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

इम्रान व बुशरा यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह झाला आहे. विवाहावेळी बुशराच्या माहेराकडील कोणी इम्रानच्या घरी राहणार नाही, असे ठरले होते. परंतु, बुशराचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा इम्रानच्या घरी राहत होता. यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. शिवाय, इम्रानच्या कुत्र्यामुळेही बुशराला त्रास सहन करावा लागत होता. विविध कारणांमुळे दोघांत सतत भांडणे होत होती, यामुळे ती घर सोडून माहेरी गेल्याचेही कारण सांगितले जात आहे.

दरम्यान, पीटीआयने इम्रान खान यांचे फेब्रुवारीमध्ये झालेल्या विवाहावेळी कुटुंबीय व नजीकचे मित्र सहभागी झाले होते. यापूर्वी इम्रान खान यांचे दोन विवाह झाले आहेत. काजी मुफ्ती सईद यांनी त्यांचा विवाह पार पाडला. यापूर्वीही त्यांनीच त्यांचे दोन्ही विवाह पार पाडले होते.

इम्रान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका या आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांना तीन मुली आणि दोन मुले अशी पाच मुले आहेत. त्यांचा पहिला विवाह इस्लामाबाद के सिनियर कस्टम ऑफिसर खवार फरीद यांच्यासोबत झाला होता. इम्रान खान यांचा पहिला विवाह ब्रिटीश नागरिक पत्रकार जेमिना खान यांच्यासोबत झाला होता. नऊ वर्षांनंतर या दोघांमध्ये 2004 साली तलाक झाला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा विवाह 8 जानेवारी 2015 ला टीव्ही अँकर रेहम खान यांच्यासोबत विवाह केला. मात्र, यांचा विवाह 10 महिनेच टिकला आणि ते वेगळे झाले. आता त्यांनी तिसरा विवाह केला आहे.

Web Title: pti imran khans Marriage In trouble