कतारमधील सैन्य मागे घेणार नाही: इर्दोगान

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

इस्तंबूल - कतारमधून तुर्कस्तानने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी अरब देशांनी केलेली मागणी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप इर्दोगान यांनी आज फेटाळून लावली.

इस्तंबूल - कतारमधून तुर्कस्तानने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी अरब देशांनी केलेली मागणी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप इर्दोगान यांनी आज फेटाळून लावली.

इस्तंबूलमध्ये ईदनिमित्त नमाजपठण केल्यानतंर ते बोलत होते. इर्दोगान म्हणाले, ""अरब देशांनी केलेली मागणी योग्य नसून, कतारमधील सैन्य कमी केल्यास छोट्या आखाती देशांना धोका उत्पन्न होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कस्तान लष्कराच्या तुकड्या कतारमध्ये कायम राहतील.'' संरक्षण सहकार्य करार करताना तुर्कस्तानने कोणाची परवानगी मागितली नव्हती, त्यामुळे ही मागणी एकप्रकारे तुर्कस्तानचा अनादर करण्यासारखी आहे. अरब देशांनी निर्बंध लादले असले, तरी कतारला आपला पाठिंबा कायम राहणार असल्याचे इर्दोगान यांनी स्पष्ट केले.