फेरमतमोजणी हा गैरव्यवहार; निवडणूक संपली असल्याची ट्रम्प यांची स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - ग्रीन पार्टीकडून विस्कनसिनमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी अत्यंत चुकीची असून, असे करणे हे गैरव्यवहारासारखे असल्याचे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांना आव्हान न देता त्यांचा मान राखण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

वॉशिंग्टन - ग्रीन पार्टीकडून विस्कनसिनमधील मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी अत्यंत चुकीची असून, असे करणे हे गैरव्यवहारासारखे असल्याचे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांना आव्हान न देता त्यांचा मान राखण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

ग्रीन पार्टीच्या उमेदवार जिल स्टेन यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली असून, स्टेन यांनी मिशिगन आणि पेनिल्साव्हानिआ येथेही पुन्हा मतमोजणीची मागणी केली होती. आठ नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी अतिशय कमी मतांच्या फरकाने हिलरी क्‍लिंटन यांना पराभूत केले होते. पेनिल्साव्हानिआ आणि विस्कनसिन सोबतच मिशिगनमध्येही अत्यंत कमी मतांनी ट्रम्पनी बाजी मारली होती.

न्यूयॉर्कचे अब्जाधीश ट्रम्प यांनी जिंकण्यापूर्वीदेखील निवडणुकीत गैरव्यवहार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी निवडणूक निकालांना आव्हान देण्याऐवजी त्यांचा आदर करावा, असे म्हटले आहे.

निवडणूक संपली आहे
ग्रीन पार्टीच्या उमेदवाराकडून याचिका दाखल केल्यानंतर ट्रम्प यांनी लोकांनी मतदान केले असून, आता निवडणूक संपली असल्याचे विधान केले आहे. हिलरी क्‍लिंटन यांनीदेखील ही बाब स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान पुन्हा मतमोजणीची याचिका निवडणूक आयोगाने स्वीकारली असून, हिलरी क्‍लिंटन यांच्या प्रचार विभागाने फेरमतमोजणीसाठी ग्रीन पार्टीसोबत उतरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी मिशिगन आणि पेनिस्लाव्हानियामधील फेरमतमोजणीलाही पाठिंबा दर्शविला आहे.

ग्लोबल

क्षेपणास्त्र हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर वॉशिंग्टन: कुठल्याही प्रकारच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचे लष्कर सज्ज...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017