"वान्नाक्राय रॅन्समवेअर'वरचा रशियन उतारा:"अभिमंत्रित जल' !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

रशियाच्या ऑर्थोडॉक्‍स चर्चचे सर्वोच्च नेते पॅट्रिआर्क किरिल यांना येथील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी आमंत्रित केले होते. किरिल यांच्या हस्ते येथील कॉंप्युटर्सवर पवित्र जल शिंपडण्यात आले. या कॉंप्युटर्सच्या सुरक्षेस्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले

मॉस्को - जगभरातील लक्षावधी कॉंप्युटर्स बाधित करणाऱ्या "वानाक्राय रॅन्समवेअर व्हायरस'मुळे विविध देशांमधील नेतृत्वासमोर अत्यंत जटिल आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानासंदर्भात जगभरातील सरकारांकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. डिजिटल स्वरुपात साठवलेल्या सर्व क्षेत्रांमधील अत्यंत संवेदनशील माहितीवर या व्हायरसचा परिणाम होऊ नये, यासाठी विविध देशांमध्ये सायबर सुरक्षा अधिकाअधिक कडेकोट करण्याचे शर्थीचे यत्न करण्यात येत आहेत. रशियानेही सायबर सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याचा एक मार्ग शोधून काढून त्याची त्वरित अंमलबजावणी केली आहे.

रशियाच्या ऑर्थोडॉक्‍स चर्चचे सर्वोच्च नेते पॅट्रिआर्क किरिल यांना येथील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी आमंत्रित केले होते. किरिल यांच्या हस्ते येथील कॉंप्युटर्सवर पवित्र जल शिंपडण्यात आले. या कॉंप्युटर्सच्या सुरक्षेस्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

रशियामध्ये चर्च व राजसत्ता असा स्पष्ट भेद नसल्याने येथील धर्मसत्तेचे राजसत्तेशी अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. किरिल यांच्या हाती पोप यांच्याइतकीच सत्ता एकवटली असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. पुतीन म्हणजे "देवाचा एक चमत्कार' असल्याचे मत किरिल यांनी एकदा व्यक्त केले होते. रशियामधील अत्याधुनिक यंत्रांवर "अभिमंत्रित जल' शिंपडण्याची अनेक दशकांपासूनची प्रथाही असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. धर्मगुरु कॉंप्युटर्सवर अभिमंत्रित जल शिंपडत असल्याची छायाचित्रे रशियन सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत.

Web Title: Russia’s Top Religious Official Sprays Holy Water on Computers