अमेरिका-युरोपने तेलाच्या आयातीवर बंदी घातल्यास किंमती गगनाला भिडणार - रशिया

Crude-Oil
Crude-Oil

रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाची झळ जागतिक पातळीवर दिसत आहे. सध्या जगाच्या पाठीवर कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर्सच्या पुढे गेली आहे. यातच अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांनी रशियासोबतचे आर्थिक व्यवहार गोठवले आहेत. जर अमेरिका, युरोपने तेलाच्या आयातीवर बंदी घातली, तर किंमती $300 प्रति बॅरलवर जातील, असं रशियाने म्हटलंय.

रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी युद्धादरम्यान रशियाच्या तेल व्यापारावर प्रतिक्रिया दिली आहे. रशियन तेल आयातीवरील बंदीमुळे 'आपत्तीजनक' परिणाम होतील, असं ते म्हणाले. कारण पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी युक्रेनसाठी रशियावर आणखी निर्बंध घालण्याचा विचार केला आहे.

रशियन तेलावरील बंदीमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा विपरीत परिणाम होईल. एका रात्रीत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल $300 पेक्षा जास्त होतील. आणि त्याचा फटका जागतिक बाजारपेठेला बसेल, असं ते म्हणाले.

युरोपियन बाजारात रशियन तेलाला तत्काळ पर्याय शोधणं अशक्य आहे. ते करण्यासाठी एका वर्षाहून जास्त वेळ लागेल आणि युरोपियन ग्राहक देशांना ते परवडण्यासारखं नाही. त्यामुळे जागतिक बाजारपेठेला फटका बसेल, असं ते म्हणाले.

युरोपियन राजकारण्यांनी याचा प्रामाणिकपणे विचार करावा. त्यांच्या नागरिकांना आणि ग्राहकांना काय वाटतं हे देखील पाहावं. कारण अशा निर्बंधांमुळे गॅस स्टेशन, विजेची किंमती गगनाला भिडेल अशा इशारा रशियाने दिलाय. नोव्हाक म्हणाले की, रशियन तेलावरील निर्बंधाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण त्यावरील निर्बंध अस्थिरता निर्माण करतील आणि ग्राहकांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल.

नॉर्ड स्ट्रीम 2 पाइपलाइन प्रकल्प थांबवल्याचा बदला म्हणून, रशिया नॉर्ड स्ट्रीम 1 पाइपलाइनद्वारे पुरवठा थांबवू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाश्चिमात्य देशांना विचार करावा लागणार आहे. तुर्तास, आतापर्यंत आम्ही हा निर्णय घेतलेला नाही. कारण यामुळे कोणालाही फायदा होणार नाही, असं नोव्हाक म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com