युक्रेनमधील बाल रूग्णालयावर रशियाचा हल्ला, तिघांचा मृत्यू, १७ जखमी

रशियन सैनिकांनी मारियुपोलमधील प्रसूती रुग्णालयाची नासधूस केली
युक्रेनमधील बाल रूग्णालयावर रशियाचा हल्ला, तिघांचा मृत्यू, १७ जखमी

रशिया युक्रेनदरम्यान युद्ध चालू आहे. या युद्धाचे सर्वात जास्त परिणाम युक्रेनला भोगावे लागत आहेत. बुधवारी रशियन सैनिकांनी हवाई हल्ला कूरून बंदर शहरातील मारियुपोलमधील प्रसूती रुग्णालयाची नासधूस केली. या हल्ल्यात १७ जण जखमी झाले आहेत.तर नवजात बालकांसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनमधील बाल रूग्णालयावर रशियाचा हल्ला, तिघांचा मृत्यू, १७ जखमी
बाबा वेंगा यांनी रशियासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये माहितीये?

हा हवाई हल्ला झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलिंस्की यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, “मारियुपोलीत प्रसूती रुग्णालयात रशियन सैन्याने हल्ला केला आहे. तेथे अनेक महिला, मुले ढिगाऱ्याखाली आहेत. हत्या थांबवा! तुमच्याकडे सामर्थ्य आहे पण तुम्ही माणुसकी गमावत आहात, असेही त्यांनी म्हटले.

युक्रेनमधील बाल रूग्णालयावर रशियाचा हल्ला, तिघांचा मृत्यू, १७ जखमी
युद्धातही जपली माणुसकी! भारतीय मुलाने पाकिस्तानी मुलीला बॉम्बपासून वाचवले

दरम्यान, युक्रेनचे उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी सांगितले की, रशियन सशस्त्र दलांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत (सकाळी ७ ते सायंकाळी ७ GMT) कॉरिडॉरवर गोळीबार करण्याचे मान्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com