रशियाच्या राजदूताची तुर्कस्तानात हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

या घटनेनंतर अंकारातील रशियाच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हल्ला झाला त्या वेळी हल्लेखोर सीरियाच्या समर्थनार्थ घोषणा देत होता.

मॉस्को - रशियाचे तुर्कस्तानातील राजदूत आंद्रेय कार्लोव्ह यांची भर कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. 

अंकारातील एका कला प्रदर्शनात रशियाच्या राजदूतांवर एका बंदूकधारी व्यक्तीने हल्ला केला. कार्लोव्ह हे भाषण करत असताना सीरियाच्या समर्थनार्थ घोषणा देत हल्लेखोराने कार्लोव्ह यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात कार्लोव्ह यांचा मृत्यू झाला. मेवलूत मर्त आयदिन्तास (वय 22) अशी हल्लेखोराची ओळख असून, त्याचे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का याची चौकशी करण्यात येत आहे. 

या घटनेनंतर अंकारातील रशियाच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हल्ला झाला त्या वेळी हल्लेखोर सीरियाच्या समर्थनार्थ घोषणा देत होता.