अल्फाबेटच्या संचालकपदी सुंदर पिचाई यांची निवड

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

सॅन फ्रान्सिस्को: गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सॅन फ्रान्सिस्को: गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याविषयी अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज म्हणाले, ""गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुंदर पिचाई चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वाढ होत असून, नावीन्यपूर्ण उत्पादनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ते अल्फाबेटच्या संचालक मंडळावर आल्याने त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्साही आहे.'' भारतीय वंशाचे 45 वर्षीय पिचाई हे मूळचे चेन्नईमधील आहेत. आयआयटी खड्‌गपूरमधून त्यांनी पदवी मिळविली असून, मागील दोन वर्षांपासून ते गुगलची धुरा सांभाळत आहेत.

पिचाई यांची कंपनीमध्ये 2004 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांनी 2014 मध्ये कंपनीतील उत्पादन, अभियांत्रिकी आणि संशोधन विभागांचा ताबा त्यांच्याकडे घेतला. कंपनीचे यूजर एक अब्जाहून अधिक वाढविण्यात त्यांनी योगदान दिले आहे. जाहिरातींचे उत्पन्न आणि यूट्यूबमधील व्यवसाय वाढविण्यास त्यांनी हातभार लावला आहे. गुगलमधील उत्पादनांचा विकास आणि तंत्रज्ञानविषयक धोरण याची जबाबदारी पिचाई यांच्यावर आहे.