सौदीकडून नवाज शरीफ यांना विचारणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

इस्लमाबाद - पाकिस्तानने आपण कतारच्या बाजूने आहोत की सौदी अरेबियाच्या बाजूने हे स्पष्ट करावे, अशी विचारणा सौदीचे राजे सलमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना केली असल्याची माहिती राजनैतिक सूत्रांनी दिली आहे. कतारशी असलेले सर्व राजनैतिक संबंध तोडून टाकण्याची घोषणा काही मुस्लिम देशांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शरीफ हे सौदीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी राजे सलमान यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. कुठलीही बाजू न घेता तटस्थ धोरण स्वीकारण्यात येणार असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले.

सौदीचे राजे सलमान यांची जेद्दाह येथे शरीफ यांनी सोमवारी भेट घेतली. या वेळी राजे सलमान यांनी पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली असल्याचे वृत्त "द एक्‍स्प्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्राने दिले आहे. दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत सौदीसह काही आखाती देशांनी कतारशी असलेले संबंध संपुष्टात आणले आहेत. मुस्लिम देशांमध्ये दोन गट तयार करणाऱ्या कुठल्याही बाबीत पाकिस्तान भूमिका न घेता तटस्थ राहील, असे पाकिस्तानातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.

आखातातील राजनैतिक संकटातून तोडगा काढण्यासाठी शरीफ हे प्रयत्न करत असून, तणाव कमी करण्यासाठी कतारशी असलेल्या संबंधांचा वापर पाकिस्तानकडून केला जाईल, असे सांगण्यात आले. त्यासाठी शरीफ हे कुवैत, कतार आणि तुर्कस्तानचा दौरा करतील असेही सांगण्यात आले.