आमच्याबरोबर का आमच्याविरुद्ध: सौदीची पाकला थेट विचारणा!

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने कतार प्रश्‍नी नेमकी भूमिका घ्यावी, असा इशारा किंग सलमान यांनी पाकिस्तानला दिला आहे. कतार दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचा आरोप करत पश्‍चिम आशियातील सौदी अरेबियासह ईजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बहारीन व येमेन या देशांनी कतारबरोबरील राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत

इस्लामाबाद - कतार प्रश्‍नी तुम्ही आमच्याबरोबर आहात का नाही, अशी थेट विचारणा सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी आज (बुधवार) पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना केली.

कतार प्रश्‍नी राजनैतिक तोडगा काढण्यासाठी शरीफ हे सध्या पश्‍चिम आशियाच्या दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने कतार प्रश्‍नी नेमकी भूमिका घ्यावी, असा इशारा किंग सलमान यांनी पाकिस्तानला दिला आहे. कतार दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचा आरोप करत पश्‍चिम आशियातील सौदी अरेबियासह ईजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बहारीन व येमेन या देशांनी कतारबरोबरील राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत.

या प्रकरणी पाकचे धोरण "संदिग्ध' आहे. मात्र या प्रकरणी पाकिस्तानने पाठिंबा द्यावा, अशी सौदी अरेबियाची सरळ अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर जेद्दाह येथील सौदी राजवाड्यात शरीफ व किंग सलमान यांची भेट झाली.