दुसऱ्या महायुद्धातील जिवंत बॉम्ब निकामी करण्यात यश

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

ऑग्सबर्ग - जर्मनीत दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेला जिवंत बॉम्ब निकामी करण्यात 'बॉम्ब शोध पथकाला' काल (रविवार) यश मिळाले. शहरातील पोलिसांनी ट्विटद्वारे नागरीकांना ही माहिती दिली. तसेच ख्रिसमसच्या पूर्वसंधेला मिळालेले हे यश ही चांगली बातमी असल्याचेही त्यांनी म्हटले.

शहरात सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी हा दुसऱ्या महायुद्धात विमानातून फेकलेला 1.8 टनाचा जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती. बॉम्ब निकामी करताना दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन आसपासचा परिसर मोकळा करण्यासाठी ऑग्सबर्ग परिसरातील 54 हजार लोकांना इतरत्र हलविण्यात आले होते.

संपूर्ण परिसर निर्मनुष्य केल्यानंतर तज्ज्ञांना काल (रविवार) रात्री साडेबाराच्या सुमारास बॉम्बला निकामी करण्यात यश मिळाले.

25 किंवा 26 फेब्रुवारी 1944 रोजी, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ऑग्सबर्ग येथील 'हिस्टोरिक सेंटर' नष्ट करण्यासाठी हा बॉम्ब टाकण्यात आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स