'झुकेरबर्ग, फेसबुकवर युजर्सचा रक्तगट दाखवा'

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या ‘कव्हर पेज‘वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, अशी सूचना बांगलादेशमधील एका युजरने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना केली आहे. 

झुकेरबर्ग यांनी मंगळवारी संध्याकाळी ‘इन्स्टाग्राम‘बाबत माहिती देणारी पोस्ट लिहिली होती. झुकेरबर्ग यांच्या पोस्टला नेहमीप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळाला. या पोस्टला आतापर्यंत साडे तीन लाख पेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. राबियल इस्लाम नावाच्या एका युजरने फेसबुकच्या "कव्हर पेज‘वर रक्तगट दाखविण्याची सूचना केली आहे. तसेच राबियलने आपण विद्यार्थी असून बांगलादेशमधील असल्याचे प्रतिक्रियेत लिहिले आहे. "झुकेरबर्ग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक क्षणाला अनेक जण रुग्णालयात दाखल होत असतात. त्यापैकी अनेक जण जुळणारा रक्तगट न मिळाल्याने मृत्युमुखी पडत असतात. जर फेसबुकने प्रत्येक युजरला रक्तगट दाखविण्याची (ऐच्छिक किंवा अनिवार्य) सुविधा उपलब्ध करून दिली तर त्याचा मोठा लाभ होऊ शकेल‘, अशी सूचना राबियलने केली आहे. तसेच फेसबुक नेहमीच मानवकल्याणाचा विचार करत असून आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष न करता त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सूचनेचे इतर युजर्सनी स्वागत केले असून त्याच्या प्रतिक्रियेला साडे सहा हजारपेक्षा अधिक लाईक्‍स मिळाल्या असून 800 पेक्षा अधिक जणांनी त्याच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.