श्रीलंकेत पेट्रोल संपले; एअरलाईन्सच्या खासगीकरणाचा प्रस्ताव

2022 च्या प्रस्ताविक विकास बजेटला नवीन पर्यायी अर्थसंकल्प करण्याची योजना आखली आहे.
Ranil Wickremesinghe
Ranil WickremesingheSakal

कोलंबो : श्रीलंकेती मागील आठवड्यात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी कोलमडलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, देशाची अर्थव्यवस्था अनिश्चित अवस्थेत असून, येत्या काही महिन्यात देशाला आणि नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विक्रमसिंघे म्हणले की, देशात केवळ एक दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक असून, अनेक पेट्रोल पंपावरील इंधन संपले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पंप बंद असल्याचे बोर्ड लावण्यात आले आहे. (Sri Lanka PM Wickremesinghe On Financial Crises )

2022 साठी प्रस्तावित केलेल्या विकास बजेटला नवीन पर्यायी अर्थसंकल्प (Budget) सादर करण्याची आम्ही योजना आखली असून, तो सवलतीचा अर्थसंकल्प म्हणून सादर करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी विक्रमसिंघे यांनी सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रीय परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याशिवाय श्रीलंका एअरलाईन्सचे खाजगीकरण करण्याचाही प्रस्ताव मांडल्याचे विक्रमसिंघे म्हणाले.

एकट्या 2020-2021 साठीचा तोटा SLR 45 अब्ज इतका आहे. जो 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 372 अब्ज इतका होता. माजी सरकारच्या अर्थसंकल्पात एसएलआर 2.3 ट्रिलियन कमाईचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, यावर्षीचा वास्तविक एसएलआर 1.6 ट्रिलियन असल्याचा अंदाज असल्याचे ते म्हणाले.

अत्यावश्यक औषधांचा तुटवडा

दरम्यान, चहूबाजूंनी अडचणीत अडकलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. पेट्रोल पाठोपाठ येथील १४ अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याचेही विक्रमसिंघे म्हणाले. या तोट्यामुळे अल्पावधीत महागाई वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. मात्र, लोकांचे पगार आणि अत्यावश्यक गोष्टींसाठी आम्हाला पैसे छापणे सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय क्रेडिट लाइन वापरून आणखी दोन पेट्रोल आणि डिझेल शिपमेंट मागवण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. नोव्हेंबर 2019 मध्ये, देशाचा परकीय चलन साठा 7.5 अब्ज डॉलर होता. तथापि, आज 1 डॉलर दशलक्ष शोधणे एक आव्हान झाले असून, गॅस आयात करण्यासाठी आवश्यक 5 डॉलर दशलक्ष जमा करणे अर्थ मंत्रालयाला अवघड जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com